TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कृष्ण प्रकाश यांच्या बदलीची चौकशी करावी, अन्यथा…’, ५० संघटनांचा इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश  यांच्यावर २०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांची बदली देखील करण्यात आली आहे. मात्र, आता कृष्ण प्रकाश यांना पाठींबा दर्शवण्यासाठी ५० हून अधिक सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. कृष्ण प्रकाश यांच्या बदलीची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याकडे करणार असल्याचे महाराष्ट्र कष्टकरी पंचायत समितीचे अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले. कृष्ण प्रकाश यांची व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या पोलीस महानिरीक्षक पदावर गेल्या महिन्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी अंकुश शिंदे यांची नियुक्ती केली गेली.

पिंपरी येथे बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला ५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरात कृष्ण प्रकाश यांनी लोकाभिमूख प्रक्रिया राबविली. तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेत त्यांनी संधी दिली. त्या माध्यमातून पुढाकाराचे कार्यक्रम राबविले. कृष्ण प्रकाश यांनी सामान्यांच्या हिताचे कार्यक्रम राबवले. तसेच कृष्ण प्रकाश यांच्यामुळेच आमचे प्रश्न मार्गी लागल्याचं मानव कांबळे यांनी सांगितलं.

कृष्ण प्रकाश यांनी राजकीय गुन्हेगारी संपवली. पण २०० कोटींचा गैरव्यवहाराच्या आरोपाच्या कथित बॉम्ब लेटरवरून त्यांना बदनाम केलं. आणि त्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे. पोलीस, शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या पत्राचा आधार घेत कृष्ण प्रकाश व शहरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना नाहक बदनाम केले जात आहे. यामुळे या पत्राची चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे. या बरोबरच पोलिस आयुक्तपदावरून कृष्णप्रकाश यांच्या बदलीचे नेमके कारण काय? या बाबत देखील चौकशी झाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी करणार आहे. या मागणीची दखल न घेतल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं मानव कांबळे म्हणाले.

बाबा कांबळे (अध्यक्ष:कष्टकरी जनता आघाडी) कष्टकऱ्यांचे नेते, मानव कांबळे (ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते/अध्यक्ष:नागरी हक्क सुरक्षा समिती), राहुल डंबाळे( रिपब्लिकन युवा मोर्चा ), धनराज चरणदास बिर्दा( मा.नगरसेवक पिंपरी चिंचवड म.पालिका, उपाध्यक्ष राष्ट्रीय वाल्मिकी समाज), अजिज शेख (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष: वाहतूक आघाडी रिपाई) अंकुश कानडी (मा. नगरसेवक पिं.चिं महानगरपालिका), अनिल जाधव ( प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी),संतोष निसर्गंध(अध्यक्ष बहुजन सम्राट सेना), रफिक कुरेशी(समाजवादी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष),शिवशंकर उबाळे( शिवशाही युवा संघटना), सतीश काळे(संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष),धनाजी येळकर( छावा संघटना संस्थापक अध्यक्ष),आशा कांबळे( अध्यक्ष:घरकाम महिला सभा),दत्तात्रय शिंदे (राष्ट्रीय चर्मकार संघ पिंपरी चिंचवड शहर),रविन्दर सिंह( माहिती अधिकार कार्यकर्ते, अध्यक्ष: अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती), हामीप शेख (आपणा वतन संघटना),राजश्री शिरवळकर (आपना वतन संघटना),फातिमा अन्सारी (मानव अधिकारी),सविता पाटील( महिला सुरक्षा फाउंडेशन ऑफ इंडिया),देवशाला लक्ष्मण साळवे( सोशल वर्कर),कृष्णा आदमाने(महाराष्ट्र संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष) यासह इतर संघटनांनी कृष्ण प्रकाश यांना पाठींबा दर्शवला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button