TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १८ जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून नऊ, तर शिवसेनेकडून नऊ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याची माहिती आहे. मंत्रिपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी काही संभाव्य नावं समोर येत आहेत. भाजपकडून चौघा दिग्गजांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन, दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार या चौघांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे. पाटील, महाजन, मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या आतील वर्तुळातील नेते मानले जातात. त्यामुळे या तिघांना मंत्रिपद मिळणं साहजिकच होतं. याशिवाय, आशिष शेलार यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता असल्याने त्यांची तूर्तास मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. तर विधानपरिषदेवरील प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हेसुद्धा पहिल्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता कमी मानली जाते.

शिंदे-फडणवीसांची दीर्घ काळ चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर गेले होते. दोघांमध्ये दीड तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यामध्ये मंत्रिमंडळातील सदस्यांची नावं अंतिम करण्याबाबत चर्चा झाल्याचं समजतं. पहिल्या टप्प्यात किमान १५ ते जास्तीत जास्त १८ जणांचा शपथविधी होऊ शकतो. भाजप आणि शिंदे गटाकडून किती जणांना संधी मिळू शकते, याची उत्सुकता आहे.

नऊ माजी मंत्र्यांना बक्षीस देण्याची इच्छा

दरम्यान, पहिल्या टप्प्यात ९ माजी मंत्र्यांना संधी देण्याचा शिंदे यांचा मानस होता. शिंदे यांनी बंड केल्यानंतर ९ तत्कालीन मंत्र्यांनी (कॅबिनेट आणि राज्यमंत्री) त्यांना साथ दिली. त्या सगळ्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपदं मिळावीत, अशी शिंदेंची इच्छा होती. मात्र यातील २ ते ३ जणांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपदं दिलं जाणार नसल्याचं कळतंय. यातील एक नाव अब्दुल सत्तार यांचं असण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनाच संधी देण्याबद्दल शिंदे आणि फडणवीस यांचं एकमत झालं आहे. त्यामुळे सत्तार यांचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तार यांच्यासोबत आणखी काही जणांचा पत्ता कापला जाऊ शकतो. शिंदे यांच्या गटाला फारशी महत्त्वाची खाती दिली जाणार नाहीत. अर्थ, गृह, महसूल यांच्यासारखी महत्त्वाची खाती भाजपकडे असतील. पैकी महसूल मंत्रालय मिळवण्यासाठी शिंदे आग्रही आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button