पश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

चिमुकल्या सायकलपटू सायलीला छत्रपती उदयनराजे भोसले करणार भविष्यात लागेल ती मदत

– 10 वर्षांची सायली करतेय सायकलवर काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास

– उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसवर सायलीचे जल्लोषात स्वागत

सातारा | प्रतिनिधी

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे उदयनराजे भोसले कौतुक करतात, हे काही त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन नाही. पण त्यांनी यावेळी एका सायकलपटूचे कौतुक केले आहे. ही सायकलपटू अवघी 10 वर्षांची असून ती ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा संदेश घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करत आहे. तिच्या या उपक्रमाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कौतुक करत आपण तिच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

सायली पाटील असं या 10 वर्षीय सायकलपटूचे नाव आहे. ती ठाण्याची आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा संदेश घेऊन ती काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून करत आहे. नुकतीच ती साताऱ्यात पोहोचली. तिच्या या उपक्रमाची माहिती उदयनराजे भोसले यांनी मिळाली. त्यांनी सायलीचे त्यांच्या जलमंदिर पॅलेसवर जल्लोषात स्वागत केले.

सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिने आतापर्यंत 2 हजार 200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे. तिचा आणखी 1 हजार 800 किलोमीटरचा प्रवास शिल्लक आहे. राहिलेला प्रवास ती 18 दिवसात पूर्ण करणार आहे. तिच्या प्रवासाच्या 23 व्या दिवशी ती साताऱ्यात पोहचली. तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले.

सायकल पट्टू सायलीला तिच्या पुढील प्रवासासाठी व उज्वल वाटचालीसाठी उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. फ्रान्स येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. तिला भविष्यात वाट्टेल ती मदत करणार असल्याचेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button