breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते; महादेव जानकरांचं वक्तव्य

परभणी | टीम ऑनलाइन
आमदार म्हणून निवडून देण्याचं आवाहन करताना मराठा, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देतो असं आश्वासनभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालेला असतानाच त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनीदेखील असंच एक वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली असं म्हटलं होतं. यानंतर राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर आता महादेव जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते असं वक्तव्य केलं आहे.

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात महादेव जानकर यांनी उपस्थिती लावली, यावेळी त्यांनी मराठा, ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केली. इतकंच नाही तर आमदार म्हणून निवडून देण्याचं आवाहन करताना मराठा, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देतो असं आश्वासन दिलं.

“आमचं होऊ द्या ३०-३५ आमदार, १० मिनिटात ओबीसीची गंमत करुन टाकतो. मराठ्यांना पण आरक्षण देऊ शकतो आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो. मुसलमानावर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितलं का मुसलमान, आंब्याचं दुकान बघितलं का मुसलमान, कोंबडीचं दुकान बघितलं की मुसलमान, त्याचा कुठं कलेक्टर नाय, काय नाय, बोंबा बोंब, टोपी घालून केळं विकतंय, फळं विकतंय अन् त्या मुसलमानाला लोक शिवा देतेत, हिंदू बी भिकारी अन् मुसलमान बी भिकारी, अन राज्य चालवणारा तिसराच मालक असतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे,” असं महादेव जानकर यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मराठा समाजाला माझा विनंती आहे. शाहू महाराजांनी या देशात आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं, पण नंतर आरक्षण का गेलं? शिवाजी राजादेखील ओबीसी होता. कुळवाडी भूषण राजा होता. आमच्यातल्या तथाकथित लोकांना वाटलं, आम्ही लय मोठं हाय गावचं, आम्हाला नको तसलं आरक्षण आणि आज अवस्था काय झाली आहे?”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button