ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

ओबीसी चर्चेसाठी छगन भुजबळ थेट देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी, इम्पेरिकल डाटा मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी भुजबळांनी काही दिवसापूर्वी मागणी केली होती.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं, अशी खुली ऑफर देत फडणवीसांनी केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर आज भुजबळ थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले.

 

ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्र हे पहिल राज्य आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संकटात आलं, त्यामुळे ओबीसींच्या विविध 56 हजार जागा संकटात आल्या आहेत. मी कुणावर आरोप करत नाही, ना पंकजा मुंडे ना देवेंद्र फडणवीस पण ते कशाप्रकारे दिशाभूल करत आहेत ते सांगावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे चलावं इम्पेरीकल डेटा मागावा, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button