पिंपरी / चिंचवड

महिलेला धमकी दिल्याप्रकरणी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

फोटो काढल्याचा जाब विचारल्याने एकाने महिलेला धमकी दिली. त्यानंतर त्याच्या पत्नीने महिलेच्या घरात घुसून कामगारांना काम करण्यास थांबवले. याप्रकरणी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 ते 12 जानेवारी या कालावधीत सुदर्शन नगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने रविवारी (दि. 23) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक काटे (रा. चिंचवड) व त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मालकीच्या घरात अधिकाराने शिरून त्या ठिकाणी काम करणार्‍या लोकांना धमकी देऊन दमदाटी केली. तेथे सुरू असलेल्या दुरुस्तीचे फोटो काढले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीने आरोपीला फोन केला. त्या वेळी आरोपीने फिर्यादीला धमकी देऊन शिवी दिली. 12 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या परवानगी शिवाय घरात घुसून कामगारांना काम थांबवण्यास सांगितले. याबाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button