breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमधील ‘स्पर्श’ संस्थेचे व्यवस्थापन बदला : नगरसेविका अनुराधा गोरखे

पिंपरी | प्रतिनिधी

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मधील महापालिकेचे कोविड सेंटर संचलनाची जबाबादारी दिलेल्या ‘स्पर्श’ या संस्थाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. बेडसाठी पैसे घेतल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पिटलचे व्यवस्थापन तातडीने बदलण्याची मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मध्ये महापालिकेचे कोविड सेंटर चालू असून ‘स्पर्श’ या संस्थेकडे हे कोविड सेंटर चालवायला दिलेले आहे.

परंतु, येथील मॅनेजमेंट कोविड सेंटर चालवण्यासाठी सक्षम नाही, हे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. यापूर्वीही अनेक नगरसेवकांनी या सेंटर विषयी आवाज उठवला आहे. काल तर या कॉल सेंटर मधील डॉक्टरांनीच एका पेशंट कडून एक लाख रुपये घेतल्याची तक्रार नगरसेवकांकडे केली आहे.

या सेंटर बाबत अनेक तक्रारी वेळोवेळी स्थानिक नगरसेविका म्हणून माझ्याकडे येत असतात. तेथे पेशंटला नेहमीच दुय्यम वागणूक, तथा फोन न उचलणे, योग्य माहिती न देणे असे प्रकार चालूच असतात. मागील माझ्या प्रभागातील एका महिलेचे मंगळसूत्र चोरीचे प्रकरणही या सेंटर मध्ये घडले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button