breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज ठाकरेंच्या भेटीआधीच भाजपा-मनसे युतीसंदर्भात चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई |

भारतीय जनता पार्टीचे महाष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र त्यापूर्वी या भेटीसंदर्भात बोलताना पाटील यांनी मनसे आणि भाजपाची युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र त्याचवेळी पाटील यांनी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट का घेतली यासंदर्भातही खुलासा केलाय. भाजपा आणि मनसेची युती होण्याची शक्यता नाहीय. यामागील मुख्य कारण म्हणजे मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं महत्वाचं असतं म्हणून मी उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. त्यामुळेच आज राज ठाकरेंसोबत होणाऱ्या भेटीमध्ये भाजपा आणि मनसेदरम्यानच्या युतीबद्दल चर्चा होणार असल्याचे स्पष्ट संकेत पाटील यांनी दिले आहेत.

तसेच पुढे बोलताना पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा ठाम असल्याचं सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भातील गोंधळ सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ देणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील आज सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. भाजप-मनसे युतीची चर्चा गेले काही दिवस होत असून पाटील व राज ठाकरे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपला मान्य नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे संकेत पाटील यांनी यापूर्वीही दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button