breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“आपला कुठलाही देव बॅचलर नाही, कुठलाही महापुरुष बॅचलर नाही”; चंद्रकांत पाटील

पूर्वी कॅलेजच्या कट्ट्यावर मुलं मुलींची टिंगल करताना दिसायच आता मुलींच मुलांची टिंगल करतात

पुणे : पुण्यात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा देव देवता व महापुरूषांबद्दल एक विधान केलं आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आपला कुठलाही देव बॅचलर नाही, महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं काही करता येतं, सेवाही करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखचं बनवून पाठवलं. सगळ्यांना दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर देवाने दिलं आहे. माणसाचा जन्म हा शुक्राणूपासून होतो. शुक्राणू कुणाला दिसत नाही. पण तो 100 किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधन माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? सगळी माणसं त्याने बनवली आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पूर्वी एसपी कॅलेजच्या कट्ट्यावर मुलं मुलींची टिंगल करताना दिसायची. आता मुलंच तिथे जायला घाबरतात. कारण आता मुलींच मुलांची टिंगल करतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
स्वामी विवेकानंद यांनी अव्देत विचार मांडला. जे स्वामीजींचा विचार आत्मसात करतात ते नक्की काहीतरी समजासाठी करतात. हिंदु हा एक विचार आहे. हिंदु हा धर्म नाही. हिंदु राजा कधी कुणाच्या धर्मावर आक्रमण करत नाही. आपला सनातन धर्म पाच हजार वर्षापूर्वीचा आहे. हिंदु या शब्दातच सर्व धर्म समभाव आहे. हिंदु विचारांमध्ये त्याचा आणि माझा एकच परमेश्वर आहे हा आपला विचार मांडला, असंही पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button