breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी २४ तासात १८५ मिलिमीटर पाऊस

वारणावती – चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरण परिसरातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आज (दि.२२) रोजी दुपारी तीन वाजता अंदाजे २ हजार ते ४ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग धरणातून नदी पाणी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.मंगळवारी ६८ मिलिमीटर तर बुधवारी २४ तासात १८५ मिलीमीटर पावसाची नोंद होऊन अतिवृष्टीची नोंद झाली आहे.मुसळधार पावसामुळे धरण ८१.७२ टक्के भरले असून धरणात २८.१२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात २४ हजार ४४१ क्‍युसेक्‍स पाण्याची आवक होत आहे.धरणाची पाणी पातळी ६२०.२५ मीटर झाली आहे. तर आज अखेर एक हजार १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

संततधार पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे धरणाच्या पाण्याने सांडवा पातळी गाठली आहे. त्यामुळे आज गुरुवार (दि.२२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धरणाचे दरवाजे उघडून अंदाजे दोन ते चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.पावसाचा अंदाज घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा विसर्ग कमी-अधिक प्रमाणात केला जाईल.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button