breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रामनवमीचा उत्सव चिखलीमध्ये उत्साहात साजरा

पिंपरी: मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहपुर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन शहरात साजरा करण्यात आला. चिखली साने चौक येथे विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या वतीने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात रविवारी श्रीरामाच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. शोभा यात्रेत ठिकठिकाणी महिलांनी पालखीवर पुष्पवृष्टी करुन पालखीचे दर्शन घेतले. तत्पुर्वी शनिवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी ८ वाजल्यापासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अखंड २४ तास रामायणाचे पठण आणि भजन करण्यात आले.

सजावट केलेल्या रथावर श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या वेशभूषेतील बाल कलाकार भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. महिलांनी फुगड्या खेळून आनंद साजरा केला. तरुणींनी पारंपरिक वेशभुषेत घोड्यावर स्वार होऊन सहभाग घेतला होता. आळंदीचे हभप महेश महाराज लटके यांच्या सह सहभागी झालेल्या वारक-यांचे दिंडी पथकाने आणि ध्वज पथकाने शोभा यात्रेचे वातावरण चैतन्यमय केले.

रामजन्म आरती नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या यज्ञामध्ये लालबाबू गुप्ता, अंबिकालाल गुप्ता, प्रमोद गुप्ता, बच्चाबाबू गुप्ता, शामबाबू गुप्ता, प्रियांका गुप्ता, मनिषा गुप्ता, गीता गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जरे, पत्रकार संतलाल यादव, मोहन दुबे यांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button