breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुग्णसेवेद्वारे दादांचा वाढदिवस साजरा

  • राष्ट्रवादी कामगार युनियनच्या वतीने रुग्णांना फळवाटप

पिंपरी । प्रतिनिधी
वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कामे करावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करत राष्ट्रवादी कामगार युनियन च्या वतीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप तसेच इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली अशा भावना राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर उपाध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केल्या.

नगरसेवक समीर मासुळकर यांच्या हस्ते यशंवतंराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वाबळे, पीएमपीएमएल कामगार युनियनचे सरचिटणीस सुनिल नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे शहराध्यक्ष किरण देशमुख, राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर उपाध्यक्ष संदीप शिंदे, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष दिपक मोडोंकर, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष दिपक गायकवाड, चिंचवड विधानसभा सचिव प्रफुल्ल शिंदे, चिंचवड ब्लाँक अध्यक्ष सुमित बरडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस विनोद सस्ते, राष्ट्रवादी कामगार सेल सरचिटणीस सुदामराव शिंदे, अमोल घोजगे, पीएमपीएमएल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन भोसरी डेपोचे कार्याध्यक्ष राजेश पठारे, राहुल गाढवे, राहुल जोगदंड यांच्यासह पदाधीकारी, कार्यकर्त्ये तसेच रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.

संदीप शिंदे म्हणाले, अजितदादा पवार तसेच सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन आणि सूचनांनुसार राष्ट्रवादी कामगार सेलतर्फे कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी कायम विधायक कामे केली जातात. सेलच्या माध्यमातून कोरोना काळातली मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदतकार्य करण्यात आले. दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत फळवाटप करून रुग्णसेवा करण्यात आली. तसेच सामाजिक बांधिलकी जपत इतरही सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात कामगार सेलच्या माध्यमातून सामाजिक तसेच विधायक कामे केली जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button