ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

सीबीएसई 10 वी बोर्ड परीक्षेत गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश

68 पैकी 68 विद्यार्थी उत्तिर्ण, 100 टक्के निकाल

पुणे : इ.10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल आज दि. 13 मे 2024 रोजी जाहीर झाला. या परीक्षेत स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण 68 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यापैकी 68 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण 100% टक्के आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विनायकराव भोंगाळे, सचिव श्री संजय भोंगाळे सर, संचालक सौ कविताताई कडू पाटील, सौ सरिता भोंगाळे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत,प्राचार्य सौ. ज्योती दरेकर, उपप्राचार्य श्री.धनंजय उंबरे, उपप्राचार्या सौ. अश्विनी काळे, उपप्राचार्य श्री.जोतिबा सूरवसे, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करण्यात आले.

वरद संतोष जायभाय हा विद्यार्थी 96.00 टक्के गुण मिळवून विद्यालयातून सर्वप्रथम आला आहे. शितल धीऊडी हिने 90.20 टक्के गुण प्राप्त करून संयुक्तरित्या द्वितीय आणि समेश संजय झगडे हा विद्यार्थी 88.40 टक्के गुणासह तृतीय आला आहे.

जाहीर झालेल्या निकालानुसार एकूण 1 विद्यार्थ्यांला 95 टक्क्यापेक्षा जास्त, 3 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यापेक्षा जास्त तर 14 विद्यार्थी 75 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button