breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशमुखांप्रमाणे अनिल परबांचीही सीबीआय चौकशी करा, भाजपची मागणी

मुुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता राज्याचे सार्वजनिक वाहतूक मंत्री अनिल परब  यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी काहीजण सुपात आहेत तर काही जण जात्यात, असं म्हणत महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “ही कायदेशीर बाब आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे. मात्र हसन मुश्रीफ यांनी हा भाजपाचा कट असल्याचं म्हणणं हस्यास्पद आहे. परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथून त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आलं. तिथे दिलेल्या निकालानुसार कारवाई केली जात आहे. काही काळजी करु नका परमेश्वर सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करतो” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं केलं. पुढे बोलताना त्यांनी, “परमबीर सिंह यांच्या आरोपांवरुन अनिल देखमुखांविरोधात सीबीआय चौकशी केली जाते तर वाझेने ऑन पेपर अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या नावाने वेगवेगळ्या लोकांना धमकावून पैसे घेण्यास सांगितल्याचं वाझेने म्हटलं आहे. अशीच चौकशी घोडावतांचीही झाली पाहिजे ज्यांच्याबद्दल वाझेनेच आरोप केले आहेत,” अशीही मागणी केली आहे.

प्रकरण काय आणि आज काय घडलं?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसंच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button