मुंबई

आठ रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबई | खासगी पुरवठादाराकडून चढय़ा भावाने वस्तू खरेदी केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मध्य रेल्वेच्या आठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी १२ ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली. वेद प्रकाश (तत्कालीन वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता, कुर्ला), विजय कुमार(तत्कालीन सहायक विभागीय विद्युत अभियंता, कुर्ला), सुरेश विठ्ठल कपरे(तत्कालीन वरिष्ठ सामग्री व्यवस्थापक, विद्याविहार), सुरेशचंद्रा जी. बारीया व डी.डी. सोरटे (तत्कालीन वरिष्ठ सेक्शन अभियंता), एच. एस. गोम्स व अंजली गुप्ता (तत्कालीन मुख्य कार्यालय अधिक्षक), अरुण प्रताप श्रीराम (तत्कालीन विभागीय विद्युत अभियंता) व इतर अनोळखी आरोपीविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पुरठादारांचा सहभागही असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. खासगी पुरवठादाराकडून चढय़ा भावाने वस्तू खरेदी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. २२ कोटी ६० लाख रुपयांचे खरेदी व्यवहार संशयीत असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. त्याबाबत सीबीआय अधिक तपास करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button