breaking-newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडी

मोबाईल सर्व्हिस सेंटरमधून विद्यार्थिनीचे नग्न फोटो शेअर केल्याचं प्रकरण; अ‍ॅपलला मोजावे लागले कोट्यवधी डॉलर्स!

नवी दिल्ली |

तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. या फोनमध्ये अनेक आठवणींचा साठा असतो. फोटो, व्हिडीओ यांचा संग्रह केलेला असतो. मात्र काही गोपनीय गोष्टींही दडवलेल्या असतात. हा गोष्टी कुणाच्या हाताला लागू नये यासाठी पासवर्ड ठेवला जातो. त्यामुळे तशा गोष्टी बाळगणाऱ्या व्यक्तीला भीती कमी असते. मात्र फोन खराब झाला आणि हा फोन दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीच्या हाती लागला, तर सर्वच गोष्टी उघड होतील. अशीच एक घटना अमेरिकेतील कॅलिफॉर्निया येथे घडली. एका विद्यार्थिनींने अ‌ॅपल कंपनीचा फोन तांत्रिक दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये दिला होता. मात्र फोन दुरुस्त करणाऱ्या टेक्निशिअनने त्यातील गोपनीय फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे तिला मित्र आणि नातेवाईकांचे फोन येऊ लागल्याने काही कळलंच नाही. अखेर दोन टेक्निशिअनने हे कृत्य केल्याचं तिच्या लक्षात आलं आणि या विरोधात दावा ठोकला.

ही घटना २०१६ रोजी घडली होती. टेक्निशिअनने गोपनीयतेचं उल्लंघन करत १० नग्न फोटो आणि एक व्हिडीओ तिच्या फेसबुक खात्यावरून शेअर केला होता. हे फोटो आणि व्हिडिओ तिने स्वत: शेअर केल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र मित्र आणि नातेवाईकांनी याबाबत सांगितल्यावर तिने तात्काळ फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. त्यानंतर तिने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. कंपनीने याची दखल घेत दोन कर्मचाऱ्यांना कामावरून निष्कासित केलं. या प्रकरणाचा निकाल लागला असून यावर तोडगा म्हणून कंपनीला अब्रुनुकसानीसाठी भरपाई देण्यास सांगितली आहे. तोडग्यासाठी दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. अब्रनुकसानीच्या तोडग्यासाठीची रक्कम अजून कळू शकलेली नाही. तोडगा हा गोपनीयतेच्या आधारावर केला आहे. कंपनी आणि व्यक्तीची बदनामी टाळण्यासाठी असं करण्यात आलं आहे. यानुसार व्यक्तीला खटल्याची चर्चा आणि भरपाईची रक्कम सांगण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र या तोडग्यासाठी कोट्यवधी डॉलर्सची मागणी केल्याचं बोललं जात आहे. वकीलाने या खटल्यासाठी ५ मिलियन डॉलर्सची मागणी केल्याचं द टेलिग्राफने वृत्तात सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button