पिंपरी / चिंचवड

सदनिका विकत देण्याचे आमिष दाखवून सव्वाआठ लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

सदनिका विकत देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने आठ लाख 20 हजार रुपये घेतले. मात्र सदनिका विकत न देता व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर 2015 ते 27 मार्च 2022 या कालावधीत स्पाईन रोड, पीसीएनटीडीए, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

संजय जगन्नाथ जोशी (वय 57, रा. दिघीगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश बापू लोंढे (रा. येरवडा, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना साईबाबा मंदिराजवळ, वडमुखवाडी येथे एका साईटवर सदनिका विकत देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून आठ लाख 20 हजार रुपये घेतले. मात्र फिर्यादी यांना सदनिका विकत न देता पैशांचा अपहार करून फिर्यादी यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button