breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पोटनिवडणूक निकाल अपडेट : सहाव्या फेरीअखेर भाजपाच्या अश्विनी जगताप आघाडीवर!

पुणे: गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होईल. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

सहाव्या फेरीत आश्विनी जगताप आघाडीवर आहेत. त्यांना एकूण २१ हजार २३७ मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना १७ हजार ८३७ मते, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ७ हजार ९०७ मते मिळाली आहेत. याद्वारे सहाव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांना ३ हजार ३११ मतांची आघाडी मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button