UnclogHinjawadiITPark : ‘हिंजवडी आयटी पार्क’ समस्यामुक्त करण्यासाठी उपाययोजना ‘‘फास्टट्रॅक’’वर!
सार्वजनिक वसाहत व वाहतूक सुरक्षेबाबत आढावा बैठक : PMRDA आणि PCPC चा सकारात्मक पुढाकार
पिंपरी-चिंचवड: हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी आणि अपघाती घटनांच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करत ‘UnclogHinjawadiITPark’ आणि संबंधित संघटनांच्या विनंतीनुसार PMRDA ने महत्त्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीला PMRDA, PCMC, MIDC, MSEDCL, PWD, NHAI आणि IT कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीचे मुख्य उद्दिष्ट हे हिंजवडी आणि वाकड भागातील वाहतूक सुरक्षेबाबतच्या समस्यांचा आढावा घेणे आणि सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचवणे होते. तसेच, १० जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेवरील पुढील कार्यवाहीवर देखील विचारविनिमय झाला.
बैठकीत घेतलेले मुख्य निर्णय:
-
सूर्या हॉस्पिटल बायपास: हिंजवडी आयटी पार्कच्या रचनात्मक बदलांसाठी “५ पट नुकसानभरपाई” मॉडेलवर चर्चा झाली. यामुळे रस्ते सुधारणा आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ होईल.
-
हिंजवडी रस्ता व मेट्रो: हिंजवडीच्या मुख्य रस्त्याच्या ६-लेन विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, मेट्रो मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाची प्रगती, तसेच खड्डे भरून काढण्याचे काम पुढील काही दिवसांत पूर्ण करणे आवश्यक ठरले.
-
अपघातांची जबाबदारी: आगामी काळात अपघाती मृत्यूंच्या घटनांमध्ये निष्काळजीपणाच्या दोषावर MIDC, PMRDA, PWD आणि मेट्रो अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला.
-
वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त उपकरणे: PMRDA ने PCPC वाहतूक पथकासाठी मेटल डिव्हायडर्स, CCTV कॅमेरे आणि वाहतूक सिग्नलसाठी बजेट मंजूर करण्याचे वचन दिले.
-
अरुंद रस्ते आणि अपघातांची कारणे: हिंजवडीतील अरुंद रस्त्यांचा मुद्दा गंभीर मानला गेला आणि यावर भूसंपादन व अतिक्रमण हटवण्याचे ठरले.
-
मुख्यमंत्र्यांची पुढील आढावा बैठक: मुख्यमंत्री ५/६ डिसेंबर रोजी PMRDA कार्यालयात होणाऱ्या बैठकीत या सर्व मुद्द्यांचा आढावा घेणार आहेत.
साथच, UnclogHinjawadiITPark आणि ‘वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास आणि कल्याणकारी संघटना’ यांच्या वतीने सचिन लोंढे यांनी स्कायवॉक कनेक्टिव्हिटी आणि लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी यावर दोन औपचारिक विनंती पत्रे सादर केली आहेत. या प्रस्तावांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे स्कायवॉक आणि फीडर बसेस तसेच शेअरिंग ऑटोरिक्षा सुरू करण्याचे आवाहन केले गेले आहे.
PMRDA ने पुढील बैठकीत या पत्रांची सादरीकरण करणार असून, यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
युद्धपातळीवर काम करण्याचे आवाहन
बैठकीत सर्व संबंधित विभागांना “युद्धपातळीवर” काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. PMRDA, MIDC, PWD, PCMC आणि NHAI च्या सर्व प्रमुखांना तात्काळ सुधारणा करण्यासाठी निर्देश दिले गेले आहेत. हिंजवडी आयटी पार्कसारख्या महत्त्वाच्या जागेवरील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी या बैठकीचे महत्त्व मोठे आहे. यापुढे येणाऱ्या काळात या निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिंजवडी आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर वाहतूक अनुभवता येईल.
“हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघाती घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या बैठकीत घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही PMRDA, MIDC, PWD आणि इतर संबंधित संस्थांसोबत एकत्रितपणे काम करत राहू, जेणेकरून नागरिकांची सुरक्षा आणि जीवनमान सुधारता येईल. ‘UnclogHinjawadiITPark’ संघटनांद्वारे सादर केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी ही भविष्यातील वाहतूक व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हिंजवडीतील कोंडी दूर करण्यासाठी आमच्या सर्व प्रयत्नांची एकत्रित आणि ठोस दिशा निश्चित केली आहे.”
— सचिन लोंढे, ‘UnclogHinjawadiITPark’ चे प्रतिनिधी




