breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीव्यापार

१ जुलैपासून लागू होणार नवा नियम; क्रेडिट कार्डद्वारे बिल भरण्याच्या पद्धतीत होणार बदल

Credit Card  : जर तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित बदल येत्या १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहेत. यानंतर, काही पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे बिल भरण्यात समस्या येऊ शकते. या प्लॅटफॉर्ममध्ये CRED, PhonePe, BillDesk सारख्या काही फिनटेकचा समावेश आहे. यामुळे वापरकर्त्यांवर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती जाणून घेऊयात.

RBI च्या नवीन नियमानुसार, 1 जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजेच BBPS द्वारे केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येकाला भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे बिलिंग करावे लागणार आहे. त्यानुसार 8 बँकांनी त्यांचे पाऊल पुढे टाकले आहे. यामध्ये SBI कार्ड, बँक ऑफ बडोदा कार्ड, कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे.

हेही वाचा – उद्यापासून संसदेचे अधिवेशन होणार सुरू ; पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार घेणार शपथ

तर अनेक मोठ्या बँकांनी नवीन बदलांतर्गत त्यांचे नियम बदलले नाहीत आणि यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यांचा समावेश आहे. हे नवीन नियमन भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आणले आहे.

BBPS ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने वेगवेगळ्या पेमेंट सेवांसाठी एकच प्लॅटफॉर्म तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. BBPS म्हणजे भारत बिल पेमेंट सिस्टम. जी ग्राहकांना ऑनलाइन बिल भरण्याची सेवा प्रदान करते. हे NPCI च्या अंतर्गत काम करते. समजा या नियमाचे पालन करण्यात आले नाही तर याचा परिणाम क्रेडिट कार्ड पेमेंटवर अवलंबून असलेल्या फिनटेक प्लॅटफॉर्मसाठी होऊ शकतो.

UPI आणि RuPay प्रमाणे, BBPS देखील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे तयार केले गेले आहे. Cred, PhonePe, BillDesk, BHIM, Paytm, MobiKwik सारख्या ॲप्सवर भारत बिल पे हा एक इंटरफेस आहे. याद्वारे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व बिले भरता येऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button