उद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुनिता विलियम्स 19 मार्च रोजी सुखरूप पृथ्वीवर

अंतराळवीर सुनिता विलियम्स पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय : अनेक अटकळीनंतर अखेर अंतराळवीर सुनिता विलियम्स पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना परत आणण्यासाठी मिशन लाँच करण्यात आले आहे. जर सर्वकाळी ठीक राहिले तर 3 दिवसानंतर सुनिता विलियम्स परत येतील. त्यांचे सहकारी बूच विल्मोर हे पण जमिनीवर येतील. या दोघांना सुखरूप परत आणणाऱ्या या मिशनला क्रू-10 असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये एकूण 4 अंतराळवीरांचा समावेश असेल.

ड्रॅगन कॅप्सूल झेपावले

सुनिता विलियम्स यांच्या घर वापसीसाठी, त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी एलॉन मस्क यांचे फॉल्कन 9 रॉकेट, ड्रॅगन कॅप्सूल आणि 4 अंतराळवीर अंतराळाकडे झेपावले आहेत. फाल्कन 9 रॉकेटने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून अंतराळाकडे झेप घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासात ड्रॅगन कॅप्सूल रॉकेटपासून विलग झाले. ड्रॅगन कॅप्सूल ISS कडून 28,200 किमी प्रति तास वेगाने पुढे झेपावत आहे. आज रात्री ही ड्रॅगन कॅप्सूलमधील क्रू-10 ISS वर पोहचतील. ड्रॅगन कॅप्सूल सर्वात अगोदर ISS वर डॉक करण्यात येईल.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी हवी अध्ययावत इमारत!

डॉकिंगची प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर अंतराळवीर ISS मध्ये पोहचतील. याठिकाणी त्यांची सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची भेट होईल. त्यानंतर या सर्वांना घेऊन अंतराळवीर त्यांना ड्रॅगन कॅप्सूलमध्ये आणतील. त्यानंतर स्पेस स्टेशनपासून त्यांची अनडॉकिंग होईल. त्यानंतर पृथ्वीकडे त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. ही सर्व मंडळी ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून पृथ्वीवर परत येतील. या सर्व प्रक्रियेला जवळपास 4 दिवस लागतील. येत्या 19 मार्चपर्यंत सुनिता विलियम्स आणि बूच विल्मोर पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.

287 दिवसांपासून अडकल्या अंतराळात

ड्रॅगन कॅप्सूलच्या सेफ लँडिंगसाठी एक फूल प्रुफ प्लॅनिंग करण्यात आली आहे. त्यानुसार, ही कॅप्सूल मॅक्सिकोच्या आखातात उतरवण्यात येणार आहे. पॅराशूटच्या मदतीने ही कॅप्सूल उतरवण्यात येईल. त्यानंतर रिकव्हरी टीम कॅप्सूलला बाहेर काढले. त्यानंतर अंतराळवीरांना सुरक्षितपणे किनार्‍यावर आणण्यात येईल. सुनिता आणि बूब हे गेल्या 287 दिवसांपासून अंतराळात अडकले आहेत. त्यामुळे ही कॅप्सूल दोघांसाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नसेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button