Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजी व पीएनजी महागले

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलची आज सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ झाली असताना आणि त्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता सीएनजी आणि पीएनजीही आजपासून महागला आहे. सीएनजी २.२८ रुपयांनी आणि पीएनजी २.१० रुपयांनी महागला आहे. यामुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज अनुक्रमे २५ आणि ३० पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आता आज सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. सीएनजी २ रुपये २८ पैसे किलो एवढा महागला आहे. ही दरवाढ दिल्ली, नोएडा ग्रेटर, नोएडा आणि गाझियाबादमध्ये झाली आहे. काही ठिकाणी सीएनजी २ रुपये ५५ पैशांनी महागला आहे. यामुळे दिल्लीत सीएनजी ४७ रुपये ५८ पैसे किलो झाला असून नोएडात ५३ रुपये ४५ पैसे किलो झाला आहे. घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पीएनजी २ रुपये १० पैसे क्युबिक मीटर एवढा महागला आहे. यामुळे दिल्लीत आता ३३ रुपये १ पैसा प्रति क्युबिक मिटर दराने पीएनजी मिळणारा आहे. आजपासून सीएनजी आणि पीएनजीचे हे नवीन दर लागू झाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button