अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार करण्याची भारताची योजना

S. Jayshankar : अमेरिकेच्या शुल्क आकारणीचे परिणाम अद्याप कळलेले नाहीत. कारण सध्या आपल्याला त्याबद्दल नेमके काही माहिती नाही. भारत अमेरिकेसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करत आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार करार करण्याची भारताची योजना आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बुधवारी दिली. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जगातील टॅरिफ वॉरमध्ये प्रत्येक देश स्वतःची रणनीती बनवत आहे. आपल्या देशाची रणनीती द्विपक्षीय व्यापार कराराद्वारे हा प्रश्न सोडवण्याची आहे. आम्ही ट्रम्प प्रशासनासोबत याबद्दल खूप गंभीर प्रयत्न करत आहोत, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीला फक्त सहा आठवडे झाले आहेत. दरम्यानच्या काळात अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत युरोपीय देशांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकांपेक्षा गेल्या सहा आठवड्यात अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका जास्त झाल्या आहेत यावरून तुम्ही या चर्चेच्या गतीचा अंदाज लावू शकता असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘आधार’ आता अधिक सुरक्षित आणि सोपे! नवीन ॲप लाँच; केवळ चेहऱ्याने होणार पडताळणी
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाविषयी बोलताना परराष्ट्रमंत्री म्हणाले की, अमेरिकेची कायदेशीर प्रक्रिया स्वागतार्ह आहे. राणा लवकरच भारतात येईल. मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा