Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

Business Idea : फक्त दोन लाखांची गुंतवणूक आणि महिन्याला कमवा एक लाख; वाचा संपूर्ण बिझनेस प्लॅनिंग

नवी दिल्ली : करोनाच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण यामुळे लोक अनेक छोट्या व्यवसायांकडे वळले आणि त्यातून चांगला पैसााही मिळाला. असाच एका छोट्या व्यवसायविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कमी खर्चात तुम्ही तुम्ही सहज हा व्यवसाय सुरू करू शकता.

भारतीय लोक खाण्यापिण्याचे शौकीन आहेत आणि पापड विशेषतः घरांमध्ये खूप आवडतात. यामध्ये कमी खर्चात तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. भारत सरकारच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (NSIC) यासाठी एक प्रकल्पही तयार केला आहे. पापड व्यवसायासाठी सरकारकडून स्वस्त दरात कर्जही मिळतं. आज आम्ही तुम्हाला या व्यवसायाची सर्व माहिती देणार आहोत.

किती असेल गुंतवणूक?
पापड व्यवसायात सुरुवातीला ६ लाख रुपयांची गुंतवणूक होऊ शकते, ज्यामुळे ३०,००० किलो उत्पादन क्षमता निर्माण होईल. या क्षमतेसाठी, आपल्याला फक्त २५० चौरस मीटर जागेची आवश्यकता असेल. या खर्चामध्ये तुमचे भांडवल आणि खेळते भांडवल दोन्ही आहे. तुमच्या मशीन्सचा आणि इतर खर्चही यामध्ये आहे. भांडवलामध्ये ३ महिन्यांचा पगार, तेवढ्याच दिवसांचा कच्चा माल आणि उपयुक्तता उत्पादन खर्च यांचा समावेश होतो. तसेच, जर तुम्ही जागा भाड्याने घेत असाल, तर भाडे, वीज, पाणी आदींचे बिलही त्यात आहे.

काय आहे आवश्यक ?
जर तुम्हाला पापड व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला रिक्त जागेशिवाय ३ मजूर, २ कुशल कामगार आणि एक सुपरवायजर आवश्यक आहे. तुम्ही यासाठी कर्ज मिळवू शकता. केंद्राच्या मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला ४ लाख रुपयांचे कर्ज मिळेल आणि तुम्हाला फक्त २ लाख रुपये स्वतःहून गुंतवावे लागतील. हे कर्ज तुम्हाला कोणत्याही बँकेकडून मिळेल आणि ते ५ वर्षांसाठी परत करता येईल.

उत्पन्न किती असेल?

तुम्ही पापड तयार करून घाऊक बाजारात विकू शकता. अन्यथा तुम्ही ते किरकोळ दुकानदार, सुपरमार्केट इत्यादींना खुल्या स्वरूपात पुरवू शकता. यामध्ये शक्यतो, ६ लाखांची गुंतवणूक करून तुम्ही दरमहा १ लाख रुपये कमवू शकता. यातील खर्च काढून टाकल्यास दरमहा ३५-४० हजारांचा निव्वळ नफा मिळू शकतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button