breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

बैलगाडा शर्यत लढा : सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी

  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा दिल्ली दौरा
  • बैलगाडा शौकीन अन् शेतकऱ्यांना बारीसाठी अद्याप प्रतीक्षाच

पुणे | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी घेतली आहे. त्यामुळे बैलगाडा शौकीन अन् शेतकऱ्यांना शर्यतींच्या परवानगीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत आज (दि. ६ ) सुनावणीस सुरुवात झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. शर्यत बंदीला समर्थन करणाऱ्या पक्षाकडून ॲड. अंतुरकर यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे संदीप बोदगे यांनी दिली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीच्या सुनावणीसाठी नवी दिल्ली येथे धाव घेतली होती. त्याच्यासोबत माजी महापौर राहुल जाधव आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • न्यायालयीन लढाईत आम्ही निश्चितपणे यशस्वी होवू : आमदार लांडगे

२०११ पासून राज्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी आणि शेतकरी न्याय मागत आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने कायदा केला. मात्र, प्राणीप्रेमी न्यायालयात गेले. आता सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मला खात्री आहे की, न्यायालयीन लढाईत राज्यातील बळीराजा आणि बैलगाडा शौकीन निश्चितपणाने विजयी होणार आहेत. पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार असल्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विजयाची प्रतीक्षा आहे, पण आम्ही या लढ्यात यशस्वी होणार असून, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा अधिकार आम्हाला निश्चितपणे मिळणार आहे, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button