breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

Budget 2021: ७५ वर्षांवरील नागरिकांची टॅक्सपासून सुटका

नवी दिल्ली – यंदाच्या अर्थसंकल्पात कर स्वरुपात बदल झालेला नसला तरी ७५ वर्षांवरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वृद्धांना मिळणाऱ्या पेन्शनमधील उत्पनावर रिटर्नसपासून मुक्ती मिळणार आहे.अर्थमंत्री म्हणाल्या, “देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात ज्येष्ठांना नमन करताना मी त्यांच्यासाठी नवी तरतूद केली आहे. ७५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ पेन्शन आणि त्यावरील व्याजातूनच उत्पन्न मिळते त्यांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न न भरण्याचा मी प्रस्ताव मांडत आहे.”

त्याचबरोबर ज्यांचा कर थकला आहे अशांना पुन्हा रिटर्न भरण्यासाठी ६ वर्षे जुन्या आणि गंभीर प्रकरणांमध्ये दहा वर्षे जुनी खातेवही काढावी लागते. या कालावधीच्या मर्यादेत बदल करुन ती सहा वर्षांवरुन तीन वर्षे करण्यात आली आहे. गंभीर प्रकरणांध्येही ही दहा वर्षे तेव्हाच ठेवली जाईल जेव्हा वर्षाला ५० लाखांपेक्षा अधिकची करचोरी झालेली असेल. करसंबंधी प्रकरणं संपवण्यासाठी ‘विवाद से विश्वास’ या योजना सध्या सुरु आहेत. एक लाखांहून अधिक करदात्यांनी या योजनेंतर्गत प्रकरणं संपवली आहेत, असेही यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button