breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

BSNL ने आणला जबरदस्त प्लान, ४९ रुपयांत २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्ली – सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन प्लान लाँच करणे सुरूच ठेवले आहे. या यादीत आता कंपनीने ४९ रुपयांचा नवीन स्पेशल टॅरिफ व्हाऊचर (STV-49) लाँच केला आहे. या एसटीव्हीला कंपनी १ सप्टेंबर पासून ऑफर करीत आहे. बीएसएनएलनेया एसटीव्हीला मर्यादीत वेळेसाठी लाँच केले आहे. जाणून घ्या नवीन टॅरिफ व्हाउचर्स संबंधी.

STV-49मध्ये मिळणारे बेनिफिट
बीएसएनएलचा हा नवीन स्पेशल टॅरिफ व्हाऊचर २ जीबी डेटासोबत येतो. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कंपनी यात कॉलिंगसाठी १०० फ्री मिनिट्स ऑफर करते. फ्री मिनिट्स संपल्यानंतर प्रति मिनिट ४५ पैसे दराने चार्ज केले जाते. १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानला अॅक्टिवेट करण्यासाठी सेल्फकेयर कीवर्ड ‘STV COMBO 49’ असे आहे. हा प्लान कंपनी ९० दिवसांसाठी ऑफर करीत आहे.

या युजर्संसाठी बेस्ट प्लान
यासारखा प्लान ऑफर करणारी बीएसएनएल ही एकमेव कंपनी आहे. हा प्लान जरदस्त आहे. ज्यांना कमी वैधतेत जास्त बेनिफीट हवे आहेत. तसेच कमी किंमतीत जबरदस्त बेनिफिट पाहिजेत. तसेच बीएसएनएलचा नंबर अॅक्टिव ठेवण्यासाठी सु्द्धा हा प्लान बेस्ट आहे. प्लानची किंमत फार नाही. तसेच इमरजन्सी मध्ये डेटा किंवा कॉलिंगची गरज पडल्यास हे चांगले काम करू शकते.

१०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लानमध्ये ३जीबी डेटा
बीएसएनएलकडे असे अनेक प्लान आहेत. जे १०० रुपयांपेक्षा कमी आहेत. ९४ रुपये, आणि ९५ रुपयांचे असे दोन प्लान आहेत. ज्याला कंपनीने जुलै मध्ये लाँच केले होते. ९० दिवसांची वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये प्रीपेड व्हाऊचर्सच्या मदतीने ती वाढवता येवू शकते. दोन्ही प्लानमध्ये ३जीबी डेटा सोबत कॉलिंगसाठी १०० फ्री मिनिट्स मिळते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button