TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

 ‘भाऊ वेळ संपली, दुआ करो दुआ’, मॅचच्या पहिले शादाब खानवर का आली अशी वेळ?

हे त्याचा अंतिम टप्पावर येऊन ठेपलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये T20 World Cup 2022 मधील पहिला सेमीफायनल आज बुधवारी 9 नोव्हेंबरला रंगणार आहे. पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही टीम पूर्ण प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे उद्या गुरुवारी 10 नोव्हेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड असा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. त्यामुळे फायनल गाठण्यासाठी चारही टीम सज्ज झाली आहे. जर आजच्या मॅचमध्ये पाकचा पराभव झाल्यास दुसऱ्यांदा T20 World Cup 2022  जिंकण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. अशातच पाकचा उपकर्णधार शादाब खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

‘भाऊ वेळ संपली, दुआ करो दुआ’

सेमी फायनलचा थरार रंगण्यापूर्वीच पाकिस्तानचा खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संघाचा उपकर्णधार शादाब खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. या व्हिडीओमध्ये शादाब ‘भाऊ वेळ संपली, दुआ दुआ. प्रार्थना करा, प्रार्थना करा.’ असं म्हणताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये शाबाद सोबत प्रेक्षक देखील दुआ करताना दिसतं आहेत. 

शादाब खान पाकचा स्टार खेळाडू 

आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये शादाब खानची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे आजच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी शादाब खान स्टार खेळाडू ठरणार आहे. T20 World Cup 2022 मध्ये शादाब खाने 10 विकेट्स घेतल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button