Uncategorized

वडिलांच्या मोबाईलवर पाहून भावाने केला तीन वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी | प्रतिनिधी

वडिलांचा मोबाईल घेऊन त्यात युट्युबवर पाहून बारा वर्षीय भावाने तीन वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. हा धक्‍कादायक प्रकार भोसरी परिसरात घडला.

ऑगस्ट 2021 मध्ये पिडित मुलीचे आई-वडिल दोन्ही मुलांना घरी ठेवून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी बारा वर्षीय मुलाने यूट्युबवर पाहिलेल्या चित्रफितीप्रमाणे आपल्याच बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र याबाबत घरच्यांना काहीच कल्पना नव्हती. गुरुवारी या मुलीला त्रास झाल्याने तिला वायसीएम रुग्णालयात नेले. तिथे तपासणी केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.

पालकांनी मुलीला विश्‍वास घेऊन विचारपूस केली. त्यावेळी तिच्यासोबत हे कृत्य भावाने केले असल्याचे सांगितले. पालकांनी मुलाकडे विचारणा केली असता त्यानेही बहिणीसोबत हे कृत्य केल्याची कबुली दिली. सुरवातीला याबाबत तक्रार देण्यास पालक तयार नव्हते. पोलिसांनी पालकांची समजूत घालून याबाबत तक्रार देण्यास सांगितले. मुलाच्या आईने मुलाविरोधात तक्रार दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button