पाटी-पुस्तक

अंघोळीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची भावजयीला धमकी : सावत्र दिरावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी
महिलेचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून ते व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी देत बलात्कार केला. हा प्रकार 16 डिसेंबर 2021 रोजी आणि त्यांनतर चार ते पाच दिवसांनी हिंजवडी परिसरात घडला. याप्रकरणी सावत्र दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित 25 वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी (दि. 15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 25 वर्षीय सावत्र दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेचा सावत्र दीर आहे. फिर्यादी महिलेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने घरी येऊन फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेसोबत जबरदस्ती करून शारीरिक संबंध केले. फिर्यादीचे अंघोळ करण्याचे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली. फिर्यादीने लाजे पोटी व समाजात नाव बदनाम होईल या भीतीने तक्रार दिली नाही. त्यानंतर पतीसह पोलीस ठाण्यात येऊन घडल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button