मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावारण तापू लागलं आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदर नगर येथे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये आज सकाळी साडे अकराते बाराच्या दरम्यान वाद झाला होता. या वादाचा व्हिडिओ समोर आला आहे. समाधान सरवणकर सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.
प्रभादेवी येथील साई सुंदर नगर येथे झालेल्या राड्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रभादेवी येथील साई सुंदर येथे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यात वाद झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळालं. याठिकाणी शिंदेसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. स्थानिकांनी समाधान सरवणकर यांना विरोध केला होता. शाखा उभारण्यात आली होती, त्या शाखेच्या बाहेर तात्पुरतं शेड उभारण्यात येत होतं, त्याला स्थानिक नागरिकांनी यावरुन वाद झाला. स्थानिक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात बाचाबाचीचं रुपांतर भांडणात झाल्याचं पाहायला मिळालं. एकमेकांच्या डोक्यात हेल्मेट घालण्याचा प्रकार व्हिडिओत पाहायला मिळाला.
हेही वाचा – “२ तारखेला कमळाचं बटन दाबा”; भरसभेतून एकनाथ खडसेंचे आवाहन, नंतर चूक लक्षात आली अन्…नेमकं काय घडलं?
समाधान सरवणकर हे माजी नगरसेवक आहेत. ते तिथे आल्यानंतर नागरिकांनी विरोध केल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. प्रभादेवीतील साई सुंदर नगर येथे शाखेसमोर शेड बांधत असल्याने त्याला स्थानिकांनी विरोध केला.
समाधान सरवणकर काय म्हणाले?
प्रभादेवीतील वादा संदर्भात विचारलं असता समाधान सरवणकर यांनी वाद वगैरे काही नव्हतं, असं म्हटलं. तिकडची लोकं आमची आहेत. त्यांना पाण्याची लाईन मीच दिलेल्या आहेत. 57 इंचांची मेन जलवाहिनी दिलेली आहे. त्याच इमारतीत निधीतून आणि स्व : खर्चातून जिम बांधून दिलेली आहेत. त्या इमारतीत खूप कामं केलेली आहेत, असं समाधान सरवणकर यांनी म्हटलं.
निवडणुकीसाठी इच्छुक खूप झालेले आहेत. आम्ही कायतरी करतोय हे मातोश्रीत दाखवायचं आहे, त्यासाठी हे सुरु आहे. तिकडे त्यांना कोणी विचारत नाही. इमारतीचा विषय करुन 50 लोकं गोळा करणं हा विषय त्यांचा होता, असं समाधान सरवणकर यांनी म्हटलं.
आमदार महेश सावंत काय म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. सदा सरवणकर पाच वर्ष आमदार होते, तुमच्याकडे गेली पाच वर्ष नगरसेवकपद होतं. तुम्हाला मोठे बोर्ड लावावे लागतात. लोकांना त्रास होण्यासारखी कामं करु नयेत, असं म्हटलं.
अग्निशमन दलाचा जाण्याचा रस्ता असल्यानं शेड बांधू नका असं त्यांना सांगत होतो, असं स्थानिकांनी म्हटलं.




