Breaking-newsराष्ट्रिय

मोदींनी संपूर्ण देशालाच टोपी घातली- कॉंग्रेस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पाच दिवसांसाठी तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. सिंगापूरमधील प्रसिद्ध चुलिया मशिदीला मोदींनी भेट दिली. या भेटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदींनी संपूर्ण देशालाच टोपी घातल्याचे काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे.

एका पत्रकाराने कमलनाथ यांना प्रश्न विचारला की, मोदी भारतात मुस्लिमांची टोपी घालत नाहीत आणि परदेशात गेल्यानंतर तिथल्या मशिदींवर चादर चढवतात, हा मोदींचा ढोंगीपणा वाटतो का? यावर कमलनाथ यांनी उत्तर दिले की, ज्या व्यक्तीने संपूर्ण देशालाच टोपी घातली आहे, त्या व्यक्तीने स्वतः टोपी घातली किंवा नाही याने काय फरक पडतो. काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी याबाबत ट्विट केले आहे.

मोदींनी इंडोनेशियातल्या ग्रँड इस्तिकलाल मशिदीला भेट दिली. ही मशिद आग्नेय आशियातील सर्वांत मोठी मशिद आहे. याची माहिती देताना परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविशकुमार यांनी मोदींची छायाचित्रे ट्विट केली होती. यामध्ये मोदींनी खांद्यावर हिरव्या रंगाची शाल घेतली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०११मध्ये गुजरामध्ये ‘सद्भावना उपोषणा’दरम्यान मुस्लिमांची गोल टोपी घालण्यास नकार दिला होता. त्यावरुन बराच राजकीय वाद झाला होता. तेव्हापासून मोदींनी आत्तापर्यंत अनेक समाजाचे प्रतिक असणाऱ्या टोप्या परिधान केल्या मात्र, मुस्लिमांची टोपी त्यांनी घातलेली नाही.

Abhishek Singhvi

@DrAMSinghvi

पत्रकार: कमल नाथ जी, मोदी जी को देश में टोपी पहनने और मस्जिद जाने से तकलीफ है मगर जब वो विदेश जाते हैं तो फिर टोपी भी पहनते हैं, मस्जिद भी जाते है और चादर भी चढ़ाते है ।कमलनाथ: जिस आदमी ने पूरे देश को टोपी पहना दी, वह खुद टोपी पहने या ना पहने क्या मतलब#CongressPC

View image on TwitterView image on Twitter

Narendra Modi

@narendramodi

Visited the Chulia Mosque in Singapore. The Mosque is one of the oldest in the city.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button