Breaking-newsराष्ट्रिय

नाग गळ्यात घालणं बेतलं जीवावर, सर्पदंशामुळे तरुणाचा मृत्यू

गंमत म्हणून, खेळ म्हणून किंग कोब्रा नाग गळ्यात घालणं एका चोवीस वर्षांच्या तरूणच्या जिवावर बेतलं आहे. जेव्हा या तरूणाने कोब्रा नाग आपल्या गळ्यात घातला तेव्हा या नागाने या तरूणाच्या खांद्याला चावा घेतला. ज्यामुळे या तरूणाचा जीव गेला आहे. जगदीश असे या तरूणाचे नाव आहे अशी माहिती समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील सुल्लुरपेटा शहरात घडली आहे.

ही घटना सोमवारी घडली मात्र सोशल मीडियावर जेव्हा या घटनेचा व्हिडिओ समोर आला तेव्हा यासंदर्भातले माहिती समोर आली आहे. जगदीश रस्त्यावरून फिरत असताना त्याला एक गारुडी दिसला. या गारुड्याकडे किंग कोब्रा नाग होता. हा गारुडी खेळ दाखवत होता. खेळ संपल्यावर या गारुड्याने नाग जगदीशच्या गळ्यात दिला. सुरुवातीला जगदीश नाग गळ्यात घेण्यास तयार नव्हता. मात्र नंतर त्याला मजा म्हणून असे करावेसे वाटू लागले. तेव्हा जगदीशने त्याच्या मित्राला आपला व्हिडिओ काढण्यास सांगितले. त्यानंतर हा नाग जगदीशच्या खांद्याला आणि हाताला चावला. ज्यामुळे जगदीश लगेच खाली पडला.

या घटनेनंतर जगदीशला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे जगदीशवर उपचार होणार नाहीत असे समजले मग त्याला दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथल्या डॉक्टरांनी जगदीशला मृत घोषित केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button