Breaking-newsआंतरराष्ट्रीय
अमेरिकेच्या साऊथ डकोटात प्रवासी विमान कोसळले; नऊ ठार

अमेरिकेच्या साऊथ डकोटा येथे शनिवारी रात्री एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या विमानातून १२ लोक प्रवास करीत होते. चेंबरलेन येथून उड्डाण करुन हे विमान इदाहो फॉल्सकडे निघाले होते. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या माहितीनुसार, विमानाच्या उड्डाणापूर्वीच चेंबरलेन आणि सेंन्ट्रल साऊथ डकोटामध्ये बर्फाच्या वादळाचा इशारा देण्यात आला होता.