breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Breaking News : राजकीय मानपान नाट्यात पंतप्रधान आवास योजनेची ‘लकी ड्रॉ’ रद्द!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यावरुन वाद

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची राजकीय ‘कोंडी’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

राजकीय मानपान नाट्यात पंतप्रधान आवास योजनेची नियोजित ‘लकी ड्रॉ’ पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला अखेर रद्द करावी लागली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना प्रोटोकॉलनुसार निमंत्रित करण्यावरुन महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाच्या एका आमदारांचा वाद निर्माण झाला होता. त्यावर अखेरपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रशासनाला ही सोडत रद्द करावी लागली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पिंपरी चिंचवड शहरातून पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी एकूण 47 हजार 878 इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे च-होली एक हजार 442, रावेत 934, बो-हाडेवाडी एक हजार 288 अशा एकूण 3 हजार 664 घरांसाठी सोडत काढण्यात येईल. या सोडतीनंतर सदनिकेची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. या प्रकल्पात सदनिका धारकांना पहिल्यांदा 10 टक्के स्वः हिस्सा भरावा लागणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतरांना आरक्षण ठेवले आहे.

कोरोना महामारीमुळे शासनाचे सर्व नियमांनूसार घरांच्या सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कार्यक्रम स्थळी गर्दी करु नये, त्यासाठी महापालिकेने सोडतीचा पुर्ण कार्यक्रम महापालिका फेसबुक पेजवर, युट्यूब द्वारे लाईव्ह दाखविण्यात येणार होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button