breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

Breaking News : कोरोना व्हायरस आंतरराष्ट्रीय आणीबाणी, जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वतरावर समन्वय साधता येईल यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. ज्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्था कमकुवत आहेत, अशा देशांमध्ये व्हायरसचा प्रसार रोखणे हा मोठा चिंतेचा विषय असल्याचे डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेड्रोस अॅडनम यांनी सांगितले आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा थैमान सुरू असतानाच आता इतर देशांमध्येही अलर्ट देण्यात आले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत चीनमध्ये २१३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९६९२ रूग्ण हे या व्हायरसने संक्रमित असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत चीनव्यतिरिक्त इतर देशांनाही या व्हायरसचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात केरळमध्ये नुकताच एक कोरोना व्हायरसची लागण झालेला रूग्ण आढळला आहे. तसेच जपान, जर्मनी, व्हिएतनाम आणि अमेरिका या देशांतही या व्हायरसचे संक्रमण वाढत आहे. जगभरात जवळपास २१ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी आणि तो आणखी पसरू नये यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण सगळे एकत्र येऊन हा व्हायरस रोखू शकतो असे ट्रेड्रोस अॅडनम यांनी म्हटले आहे. काही देशांनी आपल्या नागरिकांना चीनमधील वुहान प्रांतात जाण्यास मज्जाव केला आहे. तसेच वुहान येथून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे. रशियाने पूर्वेला असणारी चीनसोबतची सीमादेखील बंद केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button