breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Breaking News |पिंपरी-चिंचवडच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारताच ‘पालकमंञी अजित पवार’ त्यांच्या भेटीला

पिंपरी । प्रतिनिधी

गणेशोत्सवानंतर राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गृहविभागाने 25 अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आज हजर झाले. त्यांनी मावळते आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून पोलीस आयुक्त पदाचा आज पदभार घेतला आहे, तर पालकमंञी अजित पवार हे निवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधील वाढती गुन्हेगारी, राजकीय घडामोडी, पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहत याचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयावर ताण येत होता. त्यामुळे पुणे शहर आयुक्तालयातील आणि पुणे ग्रामीण मधील काही पोलीस स्टेशन मिळून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. 28 मे 2018 रोजी याबाबतचे आदेश देण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button