पिंपरी / चिंचवड

दुकानावर दगडफेक करून दोघांना मारहाण

पिंपरी | प्रतिनिधी

त्रिवेणीनगर येथे पाच जणांनी मिळून एका महिलेला आणि तिच्या वडिलांना व भावाला मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानावर दगडफेक करुन नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 22) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय दाखले, सविता दाखले, सत्यवान दाखले, मनीषा (पूर्ण नाव माहिती नाही) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमा करून फिर्यादी यांच्या परिसरात लोकांना मध्ये पडू नका अशी धमकी देत दहशत पसरवली. आरोपी विजय आणि सत्यवान यांनी फिर्यादी, त्यांचे वडील आणि भाऊ यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली. या भांडणात फिर्यादी यांच्या वडिलांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन आणि रोख रक्कम 11 हजार रुपये पडून गहाळ झाले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button