बॉलिवूड अभिनेता सलमान खान ;3 वेळा सर्पदंश, 6 तास रुग्णालयात
3 वेळा सर्पदंश, 6 तास रुग्णालयात; सलमानच्या फार्महाऊसवर काय घडलं
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला रविवारी सर्पदंश झाला होता. त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसवर ही घटना घडली होती. दंश केलेला साप बिनविषारी होता त्यामुळे पुढचा धोका टळला. सर्पदंश झाल्यानंतर सलमान खानला ( एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता सलमान खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सापाने तीन वेळा दंश केल्याचं सलमानने एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.
सलमान खान म्हणाला की,’फार्महाऊसमध्ये साप शिरला होता. त्याला काठीने बाहेर काढत होतो. त्यावेळी तो माझ्या हाताजवळ आला. तेव्हा मी तो बाजुला ढकलला पण तो मला तीन वेळा चावला.’ सर्पदंश झाल्यानंतर सलमान खानला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथं काही प्राथमिक उपचार केल्यानंतर सलमानला घरी सोडण्यात आलं.साप विषारी असावा असंही सलमान खानने म्हटलं आहे. तसंच रुग्णालयात जवळपास सहा तास उपचार घेतल्याचंही त्याने सांगितलं आहे. उपचार घेतल्यानंतर प्रकृती ठीक असल्याची माहितीसुद्धा सलमान खानने दिली आहे. सलमानचा आज वाढदिवस असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.