breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बो-हाडेवाडी होणार समाविष्ट गावातील विकासाचे ‘रोल मॉडेल’

  •  नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांच्या पुढाकाराने गावचा चेहरामोहरा बदलला!
  • अनेक वर्षांपासून प्रलंबित विरंगुळा केंद्र, वाचनालय, सांस्कृतिक हॉलच्या कामाला गती
  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते लवकरच होणार भूमिपूजन

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गावातील उपनगर म्हणून दुर्लक्षित राहीले होते. मात्र, बो-हाडेवाडीतील भाजपा नगरसेविका सारिका बो-हाडे यांच्या प्रयत्नामुळे अनेक विकास प्रकल्प दृष्टिक्षेपात येताना दिसत आहे. या गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले उद्यान, विरंगुळा केंद्र आणि सांस्कृतिक हॉलचे काम आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून बोऱ्हाडेवाडीची ओळख निर्माण होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढ गेल्या काही वर्षांत प्रचंड वेगाने झाली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने महापालिकेने शहरालगतचे काही भाग समाविष्ट करून घेतले. त्यामध्ये बो-हाडेवाडी या भागाचा समावेश आहे. मात्र, शहरात समाविष्ट असताना देखील उपनगर म्हणून हा भाग विकासापासून कायम दुर्लक्षीत राहिला.

मात्र, गेल्या पाच वर्षात या भागाचे खऱ्या अर्थाने नशीब पालटले. या भागात २०१७ मध्ये सारिका बो-हाडे निवडून आल्या. त्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचे ‘व्हिजन 20- 20’ डोळ्यांसमोर ठेवून प्रभागाचा विकास करण्याचे पूर्णपणे नियोजन केले. यासाठी त्यांनी प्रभागांमध्ये असणाऱ्या आरक्षणाचा अभ्यास केला. त्यानुसार नगरविकास विभाग, प्राधिकरण प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे आरक्षणांच्या विकासाला चालना मिळाली.

प्रभागात प्रकल्पांची रेलचेल…
बो-हाडेवाडी या भागातील वूडसविल्हा सोसायटीच्या मुख्य रस्त्यालगत प्राधिकरणाच्या हद्दीतील जागेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, वाचनालय, सांस्कृतिक हॉल तसेच एकर जागेमध्ये उद्यान विकसित होणार आहे. यासाठी नगररचना विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाला केलेल्या आग्रही पाठपुराव्याला अखेर यश मिळाले, अशी माहिती नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी दिली.

उपनगर भागातील पहिले उद्यान…
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात चांगले प्रकल्प साकारत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. कोविड -१९ महामारीमुळे काम करण्यासाठी उशिर झाला. मात्र, आत्ता १५ दिवसांच्या आत प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे. यामुळे बो-हाडेवाडी आजुबाजुच्या परिसरात सोसायटी वर्ग व नागरीवस्तीमधील नागरिकांना फायदा होणार आहे. याची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते लवकरच कामाचे भुमीपुजन होणार आहे. नगररचना विभागामार्फत प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरवा केला. यामध्ये अनेकदा प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आमदार लांडगे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे विकासकामांचा गती मिळाली आहे. समाविष्ट गावे आणि उपनगर भागातील पहिले उद्यान माझ्या प्रयत्नातून प्रत्यक्षात साकारत आहे, यासारखा आनंद असू शकत नाही, अशा भावना नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button