पिंपरी / चिंचवड

बावधन येथे नाल्यात आढळला मृतदेह : खुनाचा गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

बावधन येथील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह रविवारी (दि. 17) सायंकाळी सव्वासहा वाजता आढळला. या व्यक्तीचे हात पाय बांधले असून गळा देखील दोरीने आवळला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतदेह आढळलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस हवालदार आबासाहेब सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अनोळखी व्यक्तीचा (वय अंदाजे 35 ते 40) हिरव्या रंगाच्या नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून त्याच दोरीने त्याचे पाठीमागील बाजूला हात आणि पाय बांधून ठार मारले. त्यानंतर मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोणीत भरून नाल्यात फेकून दिला. रविवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button