breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

वॉशिंग्टनला हिमवादळाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत, वाहतूक ठप्प

वॉशिंग्टन | टीम ऑनलाइन
राजधानी वॉशिंग्टनसह अमेरिकेच्या पूर्व भागाला हिमवादळाने मोठा तडाखा दिला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूकही ठप्प झाली आहे. या सर्व प्रकारामुळे अगोदरच कोरोनाने हैराण झालेल्या अमेरिकेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

काही दिवसांपासून अमेरिकेच्या अनेक भागांत हिमवादळाने उग्र रुप धारण केले आहे. वॉशिंग्टन शहरात झालेल्या हिमवृष्टीमुळे रस्ते आणि घरांवर १० इंचापर्यंत बर्फाचा थर साचला. त्याचा परिणाम विमान उड्डाणे, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला. अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे नाताळाची सुट्टी संपवून घरी परतणारे अनेक पर्यटक हिमवृष्टीत अडकून पडले. हिमवृष्टीमुळे कोरोनाची अनेक केंद्र बंद करावी लागली. त्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेदेखील काही वेळ हिमवृष्टीमुळे विमानात अडकून पडले होते. त्यांचे एअर फोर्स वन विमान विमानतळावर उतरण्यापूर्वी हिमवृष्टी झाल्याने त्यांना विमानातच बसावे लागले. नंतर ते व्हाईट हाऊसकडे रवाना झाले. या सर्व प्रकाराचा मोठा फटका अमेरिकेला बसत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button