breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

म्यूकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री; परिचारिकेसह पाच जणांना अटक

पिंपरी |महाईन्यूज|

म्यूकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी एका परिचारिकेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने वाकड येथे केली.

गौरव जयवंत जगताप (वय ३१, रा. काळाखडक रोड, वाकड), अमोल अशोक मांजरेकर (वय ३९, रा. सूसरोड, पाषाण), गणेश काका कोतमे (वय ३२, रा. जनता वसाहत, पुणे), ममता देवरावजी जळीत (वय २४, रा. ज्ञानदीप शाळेजवळ, रुपीनगर), प्रदीप बाळासाहेब लोंढे (वय ३५, रा. राजेवाडी झोपडपट्टी, नाना पेठ, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. बसवराज (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. औषध निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी फिर्याद दिली आहे.

म्यूकरमायकोसिसवर वापरण्यात येणारे डी लिपोसोमोल एमफोटेरिसियिन-बी हे सात हजार ८१४ रुपयांचे इंजेक्शन काळ्या बाजारात २१ हजाराला तर बिवेसिझुम्ब हे ५४ हजारांचे इंजेक्शन ६५ हजारांला विकण्यासाठी काहीजण वाकड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी (ता. ७) दुपारी पावणे एकच्या सुमारास काळाखडकरोड येथे सापळा रचून चार जणांना जेरबंद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button