breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

भाजपाचे दरेकरांनंतर प्रसाद लाड अडचणीत?; मुंबई बँकेवरील निवड बेकायदा असल्याचा आरोप

मुंबईः मुंबई बँकेवर पगारदार प्रवर्गातून निवडून आलेले आमदार प्रसाद लाड यांची निवड बेकायदा असल्याचा आरोप सहकार सुधार समितीतर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. तसेच मुंबई बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे व बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी हे आरोप केले.

‘पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या उपविधीनुसार सहकारी संस्थेचे सभासदत्व हे फक्त कायम कर्मचारी असलेल्या व्यक्तीलाच देण्यात येते, असा नियम आहे. मात्र प्रसाद लाड हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तसेच ते व्यवसायाने उद्योजक आहेत. त्यामुळे ते पगारदार नोकरदार नक्कीच नाहीत. गेले अनेक वर्षे ते पगारदार नोकरदारांच्या सहकारी संस्थेतर्फे मुंबै बँकेवर निवडून जात आहेत. हे अत्यंत गंभीर असून जनतेची आणि विधान परिषदेची दिशाभूल करणारे आहे,’ असा आरोप धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

प्रवीण दरेकरांबरोबरच आणखी तीन संचालक बोगस पुरावे देऊन, मजूर प्रवर्गातून बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आले आहेत. मात्र त्यांचे स्वतंत्र व्यवसाय असून त्यांच्या मालमत्ता कोट्यवधी रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे त्यांचीही निवड रद्द करावी, अशी मागणी यावेळी विश्वास उटगी यांनी केली. प्रवीण दरेकर संचालक असताना बँकेने मध्यप्रदेशात केलेल्या गुंतवणुकीमुळे बँकेला ३०० कोटी रुपयांचा फटका बसला. बँकेत विविध अनियमितता असून बोगस कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यातील कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात २७ कोटी रुपयांच्या बोगस कर्जवाटप प्रकरणात कर्ज देणारे आणि घेणारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत, असेही उटगी यांनी सांगितले. मुंबै बँकेत नोकरभरतीतही घोटाळा झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button