breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाटीदार समाजाला भाजपाचे ‘मोठे गिफ्ट’ : गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल..!

अहमदाबाद । टीम ऑनलाईन

विजय रूपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, या पदाची माळ कोणाच्या गळात पडणार? याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान, आज या पार्श्वभूमीवर गुजरात भाजपाच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर पक्षाचे पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी गुजरातचे पुढील मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली.

भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे. पटेल हे कडवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करतात. २०१७ मध्ये पहिल्यांदा ते आमदार बनले होते. त्यांच्या अगोदर या जागेवरून माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी देखील निवडणूक जिंकली होती.

भूपेंद्र पटेल यांच्या नावाची भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वात अगोदरपासूनच चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या नावावर आजच्या भाजपा आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला. त्यांचे नाव निश्चित होणार याबाबत वरिष्ठ नेत्यांशिवाय अन्य कुणालाही कल्पना नव्हती.

२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांना हरवलं होतं-

भूपेंद्र पटेल यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. राजकारणात पूर्णपणे प्रवेश करण्याअगोदर ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण(एयूडीए)चे अध्यक्ष देखील होते. आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपद सोडलं, तेव्हा त्यांनी अपल्या जागेवरून भूपेंद्र पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा दिला होता. एवढच नाही जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा १९९९-२००१ च्या दरम्यान पटेल अहमदाबाद नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तर, २००८-१० दरम्यान ते अहमदाबाद नगरपालिका शालेय बोर्डाचे उपाध्यक्ष होते. तर, २०१० ते २०१५ दरम्यान अहमदाबादच्याच थालतेज वार्डातून सदस्य होते.

भूपेंद्र पटेल यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांना हरवलं होतं. याबाबत एक घटना अशी देखील आहे की, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर, आनंदीबेन यांच्याच म्हणण्यानुसार भूपेंद्र पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी ही निवडणूक १ लाख १७ हजारापेक्षा अधिक मताने जिंकली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button