breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडवरील कोरोनाच्या संकटाशी लढतोय भाजपाचा ‘भाऊ’बली!

  • चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप शहरातील ‘क्टिव्ह’ नेते
  • कोरोना काळात आयुक्तांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडवर कोरोनाचे संकट असताना शहरातील अनेक नगरसेवक-पदाधिकारी ‘घरबंद’ असताना भाजपा पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष तथा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप मात्र, ‘भाऊ’बली होवून शहरवासीयांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.

कोरोनाच्या गेल्या सव्‍वा वर्षांत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका, जिल्हा प्रशासन, राज्य शासन ते अगदी केंद्र सरकारपर्यंतच्या विविध मुद्यांवर लक्ष वेधले आहे. त्याचा फायदा पिंपरी-चिंचवडमधील गोरगरिब नागरिकांपासून उद्योजकांपर्यंत झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. पर्यायाने जगताप कोरोना काळात नागरिकांच्या मदतीला धावले नाहीत, असा अपप्रचार राजकीय विरोधकांनी सुरू केला आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.

***

बांधकाम कामगारांना मदतीची हाक…

पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन या बांधकाम साइटवरून त्या बांधकाम साइटवर स्थलांतर करणाऱ्या बांधकाम कामगारांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे एक मोठा घरगुती आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सर्व नोंदित बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचा संच देण्याचा शासन आदेश जारी केला. त्यानुसार नोंदित बांधकाम कामगारांना १७ प्रकारच्या ३० नग गृहउपयोगी वस्तू मोफत देण्यात येणार आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम कामगारांसाठी कामगार नाक्यावर अटल आहार योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणीही जगातप यांनी केली आहे.

***

खासगी रुग्णालयांतील लूट थांबवा…

कोरोना काळात पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील अनेक खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट केलेली आहे. सरकारने निश्चित केलेल्या उपचार खर्चाव्यतिरिक्त रुग्णांकडून अवास्तव बिले वसूल केली आहेत. त्यामुळे दोन्ही शहरातील सर्व खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी वसूल केलेल्या बिलांचे ऑडिट करावे. जादा बिलांची सर्वसामान्यांना परतफेड करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या काळात सामान्यांना राज्य सरकारने एक रुपयाचाही दिलासा दिला नाही. वाढीव वीजबिलेही माफ केली नाहीत. आता किमान उपाचाराच्या नावाखाली खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी केलेली लूट तरी गोरगरीबांना परत मिळवून द्या, असे आवाहन जगताप यांनी वर्षभरापूर्वीच केले आहे.

***

पिंपरी-चिंचवडकरांना मोफत लसीची मागणी…

शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस मोफत देण्यात यावी. त्याबाबत आपण संबंधितांना आदेश द्यावेत, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली होती. त्यानुसार स्थायी समिती सभेमध्ये निर्णयही घेण्यात आला आहे. राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत घोषणा केली असली, तरी पिंपरी-चिंचवड महापालिका स्वतंत्रपणे तयारी करणार आहे.

***

पिंपरी गुरव येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले…

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. रुग्णांना सेवा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर सुद्धा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळेगुरव येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. आमदार लक्ष्मण जगताप हे शहरातील नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी नेहमीच झटत असतात. आता कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल शहरातील इतर सर्व राजकारण्यांसमोर आदर्श निर्माण करणारे ठरेल.

***

रुग्णवाहिका चालकांकडून होणाऱ्या लूटीला चाप…

कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत तसेच उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक लूट सुरू आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी संताप व्यक्त केल्यानंतर पुणे जिल्ह्याचे प्रशासन खडबडून जागे झाले. रुग्णवाहिकांनी रुग्णांना ने-आण करण्यासाठी किती दर आकारावेत याचे प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) दरपत्रक जाहीर केले आहे. तसेच हे दरपत्रक संबंधित रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. या दरपत्रकापेक्षा जास्त भाडे आकारल्यास [email protected] या ईमेल आयडीवर तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. अशा तक्रारींची नोंद घेऊन संबंधित रुग्णवाहिकेवर आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

***

उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही घेतली दखल…

आमदार लक्ष्मण जगताप यांनी गोरगरीब रुग्णांसाठी आमदार निधीतून रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यास “खास बाब” म्हणून मान्यता देण्याबाबत केलेली सूचना अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केली. आमदार जगताप यांनी केलेल्या या एका सूचनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री, औषधे व साहित्य खरेदीसाठी ३०० कोटींहून अधिक रुपयांचा आमदार निधी उपलब्ध होणार आहे.

***

‘जीएसटी’बाबत केंद्रीय मंत्र्यांना निवेदन…

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग व इतर आस्थापना गेल्या दोन महिन्यांचा जीएसटी भरू शकले नाहीत. त्यामुळे जीएसटी भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देऊन हा कर भरणाऱ्या सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी निर्मला सितारमण यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. एप्रिल महिन्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे जीएसटी भरण्यास बांधील असलेले व्यापारी व इतर आस्थपना मुदतीत तो भरू शकले नाहीत. त्यांना जीएसटी भरण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे जीएसटी भरण्यासाठी उद्योजकांना मुदतवाढ द्यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button