breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकावरून भाजपा युवा मोर्चा आक्रमक

  •  डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाबाहेर विरोधाचे फलक

पिंपरी | प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळे भाजपाचे नेते, कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार विरोधात पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चा शराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विद्यापीठांच्या कुलगुरु यांचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आल्याने त्याचा निषेध भाजपाच्या वतीने करण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग महाराष्ट्र सहसंयोजक वैशाली खाडे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अजित कुलथे, सरचिटणीस दीपक नागरगोजे, गणेश जवळकर, राजेंद्र धावण, उपाध्यक्ष राहुल खाडे, अमित देशमुख, सतीश नागरगोजे, जिल्हा चिटणीस प्रणव पिल्ले, मण्डल अध्यक्ष सुनील घाटे, युवती संयोजिका सोनम गोसावी, विद्यार्थी विभाग संयोजक दिगंबर गुजर, सहसंयोजक अनिकेत शेलार, अजय मोरे, सुहास आढाव, काशिनाथ तिवारी आदी उपस्थित होते.

संकेत चोंधे म्हणाले की, विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक म्हणजेच शिक्षण व्यवस्थेसाठी काळे विधेयक आहे. जे या आघाडी सकारने आणलेले आहे. ते परत घेण्यात यावे. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा आग्रही आहे. आम्ही आंदोलनात्मक भूमिका कायम ठेवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button