breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपाचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे ‘ऑन ॲक्शन’

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभा निर्विघ्न सुरू

राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांच्या आंदोलनाला ‘कात्रजचा घाट’

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांनी लाच प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पहिल्याच स्थायी समिती सभेला हजेरी लावली. त्यांनी शहरातील प्रमुख प्रभागतील नगरसेवकांशी सभापती लांडगे यांनी सांवाद साधला. स्थायी समितीतील भाजपाचे सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर प्रलंबित विकासकामे आणि स्थायी समितीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांबाबत संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना सूचना केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिका सहशहर अभियंता, शहर अभियंता यांच्यासह प्रमुख विभातील अधिकाऱ्यांकडून सभापती लांडगे यांनी विकासकामांबाबत आढावा घेतला. रस्ते, पाणी, वीज यासह नागरी आरोग्याशी संबंधित विकासकामे मार्गी लावण्याबाबत वस्तुनिष्ठ चर्चा केली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील प्रलंबित कामांना गती दिली पाहिजे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लाच प्रकरणानंतर चर्चेत आलेले सभापती लांडगे पहिल्याच स्थायी समिती सभेला आत्मविश्वासपूर्ण वावरताना दिसले. भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांमधील विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्ग काढण्याबाबत सबंधित विभागाप्रमुखांशी चर्चा केली.

विरोधी पक्ष राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांकडून होणाऱ्या टीकेबाबत बोलताना सभापती लांडगे म्हणाले की, ‘‘मी माजी आमदार आणि महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांचा मुलगा आहे. आमच्या राजकीय जीवनात चढ-उतार नवे नाहीत. आज जे लोक माझ्यावर टीका करीत आहेत. तेच लोक भविष्यकाळात माझ्या कार्याचे कौतूक करतील. माझ्या कृतीतूनच विरोधकांना उत्तर मिळेल.

सभापतींच्या राजीनामाच्या चर्चेला पूर्णविराम…

दरम्यान, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महापालिका भवन असा मोर्चा काढून स्थायी समिती बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच, राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य सभेला उपस्थितही राहिले नाहीत. स्थायीचे कामकाज बंद राहील किंवा सभापती लांडगे यांचा पक्षाकडून राजीनामा घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button