breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगावात भाजपला जबरदस्त धक्का! रक्षा खडसे, स्मिता वाघ यांचे अर्ज बाद

जळगाव- जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर विकास सोसायटी मधून बिनविऱोध निवडून येणार आहेत. अर्जामधील त्रुटीमुळे एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अर्जांवर सुनावणी सुरू होती. अद्याप यामध्ये किती अर्ज अवैध, वैध याची माहिती निवडणूक विभागातर्फे मिळू शकली नाही. संचालकपदाच्या 21 जागांकरिता 279 जणांनी अर्ज दाखल करण्यात आले होते.यामध्ये 3 जागा बिनविरोध झाले असून 19 जागांकरिता 21 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

8 नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. बुधवारी अर्ज छाननी होऊन किती उमेदवारी अर्ज वैध, अवैध ठरले असते.मात्र,अनेकांनी बहुतांश उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेतल्यामुळे त्यावर सुनावणी सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध कार्यकारी सहकारी संस्था गटातून प्रत्येकी एक- एकच अर्ज आल्यामुळे धरणगाव गटामधून संजय मुरलीधर पवार राष्ट्रवादी, पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील, एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील शिवसेना असे बिनविरोध झाले आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button