breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाजपचे खासदार राम स्वरुप शर्मा यांची आत्महत्या

नवी दिल्ली – भाजपचे खासदार राम स्वरुप शर्मा यांनी दिल्लीतील खासदार निवासात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मृत्यूसमयी ते ६२ वर्षांचे होते.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार राम स्वरुप शर्मा आंनी आत्महत्या केली. शर्मा यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांने दिल्ली पोलिसांना ८.३० वाजता याची फोन करून माहिती दिली. शर्मा यांनी आत्महत्या केल्याचं कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह लटकेल्या अवस्थेत आढळून आला. शर्मा यांनी आत्महत्या का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

“शर्मा यांच्या रुमचा दरवाजा उघडण्यास गेलो, तेव्हा दरवाजा आतून बंद करण्यात आल्याचं कळलं. त्यानंतर मी आवाज दिले. वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलीस आले आणि त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी खोलीत शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला,” अशी माहिती शर्मा यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button